ब्लू व्हेल गेमची मास्टर माईंड सापडली!

मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे. रशियन पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

ही मुलगी नेमकी कोण आहे? याबद्दलची माहिती पोलिसांनी अजून उघड केली नाही. ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर आहे.

👉 _*तीन वर्षांची शिक्षा!*_

पोलिसांनी आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक केली. आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी मुलीला न्यायालयात हजर केलं असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, ही मुलगी पीडित मुलाला 50 टक्के टास्क देते, ज्याचा उद्देश मुलांना मानसिक त्रास देण्याचा असायचा आणि खेळाच्या शेवटच्या टास्कमध्ये त्यांना आत्महत्या करायला लावण्याचा असायचा. ही मुलगी ‘डेथ ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर’ अशीच ओळखली जात आहे, असे रशियाच्या चौकशी यंत्रणेने म्हटले आहे. तिने स्वत: ब्लू व्हेल चॅलेंज खेळण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं पण ती आव्हान पूर्ण करू शकली नाही म्हणून ती खेळाची अ‍ॅडमिन बनली. मग ती ग्रुपवरील कित्येक डझन सदस्यांना ही मुलगी बहुतेक वेळा जीव जाण्याचीच शक्यता असलेली आव्हाने पाठवायची, अशी माहिती समोर आली आहे.

Hey I’m Tushar Patil, I’m a Mechanical Engineer & also a Technology Geek & Gamer. I love New Technologies and Games. I have Youtube Channel “Tech Tush” on which I upload videos about New Tech And Games. Subscribe If you Like it.
Posts created 52

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

Begin typing your search term above and press enter to search. Press ESC to cancel.

Back To Top